"पनवेल महापालिका ठाकूर परिवाराची प्रायव्हेट प्रॉपर्टी" भाजपच्याच नगरसेविकेचा आरोप

Update: 2021-10-03 15:53 GMT

पनवेल महानगर पालिकेने करामध्ये मोठी वाढ केल्याने, विरोधी पक्षांसह सत्ताधारी भाजपच्याही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता भाजपच्या नगरसेविका लीना गरड यांनी या कर वाढीला विरोध केला आहे. एवढेच नाही तर पनवेल महानगर पालिकेच्या कारभारात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि ठाकूर परिवाराकडून हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. "महापालिकेच्या कोणत्याही मीटिंग अगोदर पक्षातील नगरसेवकांची बैठक घेऊन सभेत कोणकोणते विषय घ्यावेत आणि कोणती कामे मंजूर करावीत हे ठरविले जाते,एखाद्या कामाविषयी आपली काही तक्रार असेल तरी ती मांडू दिली जात नाही, दबाव टाकला जातो, असा आरोप त्यांनी केला आहे. तर पनवेल महानगर पालिका ठाकूर परिवाराची प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्याचा सनसनाटी आरोपही लीना गरड यांनी केला आहे. तसेच आपल्याला वर्षाला मिळणारा पाच लाख रुपयांचा निधीही खर्च होत नसून,प्रभागातील काहीच कामे करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पण प्रशांत ठाकूर यांना विचारले असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. एवढेच नाही तर गरड यांनी हे सर्व आरोप द्वेषातून केले आहेत, त्यांना महापौरपद मिळाले नसल्याने त्यांनी रागापोटी आरोप केले केल्याचे प्रत्युत्तर ठाकूर यांनी दिले आहे. महापौर कविता चौतमोल आणि इतर भाजप नगरसेविकांनीही गरड यांचे आरोप फेटाळले आहेत. पण भाजपच्याच नगरसेविकेने आरोप केल्याने भाजपमधील दुही यामुळे समोर आली आहे.

Tags:    

Similar News