पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी ओकले विष, दिली युध्दाची धमकी

शिया युक्रेन युध्दाने जगाचे टेन्शन वाढवले आहे. त्यातच भारताचे कुरापतखोर शेजारी राष्ट्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताविरोधात विष ओकत युध्दाची धमकी दिली आहे.

Update: 2022-02-28 03:29 GMT

रशिया युक्रेन युध्द सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित वित्तहानी होत असून जग तिसऱ्या महायुध्दाच्या उंबरठ्यावर असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच भारताचा कुरापतखोर शेजारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली आहे.

इम्रान खान म्हणाले, 20 फेब्रुवारी 2019 रोजी भारताने पाकिस्तानच्या बालाकोट येथे केलेला हवाई हल्ला आम्ही विसरलो नाहीत. त्याच बालाकोट हवाई हल्ल्यावरून इम्रान खान यांनी भारताला युध्दाची धमकी दिली आहे. तर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर भारतावर प्रतिहल्ला करण्याचा पाकिस्तानी लष्कराचा प्रयत्न फसला होता. परंतू पाकिस्तानी लष्कराने केलेल्या प्रयत्नाचे इम्रान खान यांनी कौतूक केले होते. तर यावेळी इम्रान खान यांनी भारताविरोधात विष ओकले. ते बालाकोट हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्याच्या वर्धापन दिनानिमीत्त इम्रान खान बोलत होते.

इम्रान खान म्हणाले की, भारतीय हवाई दलाचे तात्कालिन विंग कमांडर अभिनंदन हे त्यांच्या जुन्या मिग 21 बायसनमधून पाकिस्तानी हवाई दलाचे आधुनिक बांधणीचे एफ 16 हे विमान पाडले होते. त्यावरून इम्रान खान यांनी भारतावर टीका केली.

चर्चा आणि मत्सुद्देगिरीच्या माध्यमातून संघर्ष कमी करण्यावर आमचा विश्वास आहे. पण हे दुर्बलतेचे लक्षण नाही. मात्र जेव्हा भारत आमच्यावर हल्ला करेल तेव्हा पाकिस्तानी लष्कर आक्रमकपणे भारताला प्रत्युत्तर देईल. कारण आम्ही आमच्या देशाच्या सुरक्षेसाठी कटीबध्द आहोत, असे वक्तव्य केले.

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी रशियाचा दौरा केला होता. तर रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युध्दात रशियाने आक्रमण केल्याच्या दिवशी मी रशियात पोहचलो, हा मोठा योगायोग असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले होते. मात्र रशिया दौऱ्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताविरोधात विष ओकले आहे.

Tags:    

Similar News