'त्या'वेळी सभागृहात गर्दी नसल्याचे म्हणत पी चिदंबरम यांनी काढला पंतप्रधानांना चिमटा

Update: 2021-09-26 05:37 GMT

न्यूयॉर्क  : संयुक्त राष्ट्रांच्या 76 व्या आमसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत पाकिस्तानचे नाव घेता इशारा दिला आहे,दहशतवादाचा हा भस्मासुर तुमच्यावरही उलटू शकतो असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. सोबतच अफगाणिस्तानचा वापर दहशतवाद व घातपाती कारवायांसाठी होणार नाही याची जगाने दक्षता घेतली पाहिजे असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. मात्र, पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी सभागृहात गर्दी नसल्याचे म्हणत माजीमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी पंतप्रधानांना चिमटा काढला आहे. 

काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी ट्विट करत युएनमधील पंतप्रधान मोदींच्या भाषणावर भाष्य केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी युएनच्या सर्वसाधारण सभेत भाषण करत असताना सभागृहात फक्त काहीच सीट भरलेले होते. त्यामुळे, मी निराश झालो, त्यापेक्षाही निराश कुणीही टाळी न वाजवल्याने झाली, असं उपहासात्मक ट्विट चिदंबरम यांनी केले आहे.

Tags:    

Similar News