सांगलीत शेतकऱ्यांचा उद्रेक, महावितरणला लावली आग, जिल्हाधिकारी कार्यालयातही सोडले साप

दिवसा वीज देण्याच्या मागणीसाठी आंदोलनाची दखल न घेतल्याने शेतकऱ्यांचा उद्रेक झाला.

Update: 2022-02-28 07:54 GMT

राज्यात राजकीय चिखलफेक सुरु असतानाच दुसरीकडे शेतकऱ्यांनी पिकाला पाणी देण्यासाठी दिवसा वीजेची मागणी करत आंदोलन सुरू केले आहे. मात्र या आंदोलनाकडे प्रशासन किंवा राजकीय नेत्यांनी लक्ष न दिल्याने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात साप सोडून तर कासबेदिग्रज येथे महावितरणला आग लावल्याने शेतकऱ्यांचा उद्रेक समोर आला आहे.

शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी दिवसा वीज देण्याची मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र या आंदोलनाची दखल अद्यापही घेण्यात आली नाही. त्यामुळे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात साप सोडून तसेच कासबेदिग्रज येथील महावितरणच्या कार्यालयाला आग लावल्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक पहायला मिळाला आहे.


 



पिकाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या अशी मागणी करत गेल्या सात दिवसा पासून माजी खा राजू शेट्टी हे कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनस बसले आहेत. शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज द्या , वाढीव वीज दर रद्द करा, वीज कनेक्शन तोडणी मोहीम थांबवा, वीज बिले दुरुस्त करून द्या आदी मागण्यांसाठी राजू शेट्टी यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मात्र आठवड्यानंतरही सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल न घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक पहायला मिळत आहे.



 

वीज प्रश्नावर गेल्या दहा ते बारा दिवसांपुर्वी शेतकऱ्यांनी कोल्हापुर आणि सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाला इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही प्रशासनाला जाग न आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दखल न घेणाऱ्या प्रशासनाविरोधात महावितरणच्या कार्यालयाला आग लावल्याने शेतकऱ्यांचा उद्रेक झाला आहे.

शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला लावलेल्या आगीत कागदपत्रे व अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. तर आगीच्या ज्वाला आकाशाला भिडल्या होत्या. मात्र अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र यानिमीत्ताने शेतकऱ्यांचा उद्रेक वाढत असतानाही राज्यात राजकीय घमासान सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उद्रेकाची लवकर दखल घेतली नाही तर येत्या काळात आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Tags:    

Similar News