आमचे नेते व्यापारी नाहीत – संजय राऊत

Update: 2019-11-10 06:40 GMT

राज्यपालांनी भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापनेसाठी आंमत्रीत केले आहे. राच्यापालांच्या निर्णयाचं स्वागत संजय राऊत यांनी केलं. भारतीय जनता पार्टीने पुढील २४ तासात सत्ता स्थापन करायला हवी त्याचबरोबर भाजपने सत्ता स्थापन करुन आपलं बहुमत सिध्द करावं असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

भाजप बहुमत सिध्द करण्यासाठी कॉँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोडू शकते, असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले असं शक्य नाही राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसचे नेते फुटणार नाही. राष्ट्रवादी कॉग्रेस यांची १२ तारखेला मिटींग आहे. तर तुमची काही डिल होईल का? असं विचारले असता संजय राऊत म्हणाले आमचे नेते व्यापारी नाहीत डिल करायला. असं यावेळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

Similar News