श्रीमंतांसाठी लॉकडाऊन नाही का? विरोधकांचा गृहमंत्र्यांना सवाल

Update: 2020-04-10 00:56 GMT

मुंबईतील उद्योगपती वाधवा यांना खंडाळा ते महाबळेश्वरला २३ जणांसह जाण्यास राज्याच्या गृह मंत्रालयानं परवानगी दिल्यानंतर आता विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख. यांना टार्गेट केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन सरकारला सवाल विचारला आहे, महाराष्ट्रात श्रीमंतांसाठी लॉकडाऊन नाही का? असा सवाल करत फडणवीस यांनी अशाप्रकारे नियम धाब्यावर बसवून परवानगी देण्याचे काम आयपीएस अधिकारी स्वत:हून करणार नाही त्यांना कुणी परवानगी द्यायला लावली असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान आता याच मुद्द्यावरुन भाजपचे माजी खासादार किरीट सोमय्या यांनीदेखील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाधवांना परवानगी का दिली हे जनतेपुढे स्पष्ट करावे अशी मागणी केली आहे. “जे वाधवा बंधु DHFL आणि YES BANK घोटाळ्यातील आरोपी आहेत, ज्यांच्याविरोधात सीबीआयने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे, त्यांना अटक करुन सीबीआयच्या ताब्यात देण्याऐवजी राज्य सरकार त्यांना व्हीव्हीआयपी वागणूक का देत आहे, हे गृहमंत्री अनिल देशमुख यांना जनतेपुढे स्पष्ट करावे,” अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

दरम्यान दिल्लीतील मरकजच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी का दिली असा सवाल गुरूवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारला होता. याच कार्यक्रमामुळे देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने केंद्रीय गृह मंत्रालय याला जबाबदार असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला होता.

Similar News