महाराष्ट्रात विरोक्षी पक्षाचा वनवास 14 वर्षे – सामना

Update: 2020-05-26 04:02 GMT

कोरोनाचे संकट हाताळण्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी स्वत: मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चा सुरू असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून विरोधकांवर हल्ला करण्यात आला आहे.

“महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने असे ठरवले आहे की, सरकारविरोधात आपल्या तोंडाचा ताशा वाजवत ठेवायचा, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, राज्य सरकार कसे अपयशी ठरत आहे व जनता कशी वाऱ्यावर पडली आहे अशी बदनामी करायची. हे सर्व करीत राहिल्याने ठाकरे सरकार कोलमडेल व आपला वनवास संपेल असे दिवास्वप्न विरोश्री पक्ष पाहत आहे. विरोधी पक्ष त्यादृष्टीने भ्रमात आहे, असे काही घडण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचा वनवास 14 वर्षांचाच असेल हे आम्ही खात्रीने सांगू शकतो.”

अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे. त्याचबरोबर “गुजरातला तर न्यायालयानेच झापले, पण तेथील राज्यपालांनी आढावा बैठक घेतल्याचे दिसत नाही. मग हे सर्व महाराष्ट्रातच का घडवले जात आहे? ज्या राज्यात ऑक्सिजन अभावी 200 अर्भक तपढून मरतात त्या राज्यात सर्व आलबेल, पण महाराष्ट्रात 15 हजारांवर रुग्ण कोरोनावर विजय मिळवून घरी गेले ते सरकार अपयशी ठरविण्याचे हे कुटील कारस्थान असून महाराष्ट्राचा विरोधी पक्ष या कारस्थानाचा सूत्रधार ठरत आहे.” असाही आरोप करण्यात आला आहे.

Similar News