विधानसभा अध्यक्षांची निवडणूक, घोडेबाजाराच्या भीतीने आवाजी मतदान?

Update: 2021-12-22 14:49 GMT

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवर घेरले. पण महाराष्ट्राच्या इतिहासात एवढे असुरक्षित सरकार कधी पाहिले नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक सरकारने गुप्त पद्धती ऐवजी आवाजी मतदानाने घेण्याचा निर्णय घेतला, त्यावरुन फडणवीस यांनी ही टीका केली. विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानानं करण्यात येणार आहे, त्यासाठी काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकी संदर्भातील नियम समितीचा अहवाल सभागृहात मांडला, यालाच विरोधी पक्षाने आक्षेप घेत सरकारवर टीका केली.

सरकारकडे १७० आमदारांचे बहुमत आहे, तरीही सरकारच्या मनात अध्यक्ष निवडणुकीसाठी आपल्याच आमदारांवर विश्वास नाही का, असा सवाल फडणवीस यांनी विचारला. या चर्चे दरम्यान काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी घोडेबाजार बंद व्हावा म्हणून घटनादुरूस्ती झाल्याचे सांगितले, तेव्हा विरोधकांनी घोडेबाजार शब्दावर आक्षेप घेतला. पण विरोधकांना घोडेबाजार म्हटल्यावर राग का येतो, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.


Full View

Tags:    

Similar News