या प्रश्नावर संपली निर्मला सीतारमन यांची मंदीवरची पत्रकार परिषद

Update: 2019-08-23 14:35 GMT

निर्मला सीतारमन यांनी मंदीसंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशाची अर्थव्यवस्था इतर प्रगत किंवा प्रगतीशील देशांपेक्षा चांगली असल्याचं सांगीतलं. भारताचा महसूलही वाढत असल्याचं सीतारमन यांनी स्पष्ट केलं.

यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी दिली. जवळपास 1 तास 38 मिनिटे चाललेल्या या पत्रकार परिषदेचा शेवट मात्र एका तगड्या प्रश्नावर झाला. या प्रश्नावर उत्तर न देताच अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषद संपवली.

एका पत्रकाराने अर्थमंत्री सीतारमन यांना थेट विचारलं की, 2016 ते 2019 मध्ये एक टक्क्याची महसूली घट आलीय हा नोटबंदी आणि जीएसटीचा परिणाम आहे का? आणि दुसरं तुमचे सर्व अर्थविषयक सल्लागार आणि जाणकार जेव्हा सरकारच्या बाहेर जातात तेव्हा आर्थिक धोरणांवर टीकाच का करतात..? या प्रश्नानंतर पत्रकार परिषदेत सन्नाटा झाला आणि थोडावेळ स्तब्ध झालेल्या निर्मला सीतारमन यांनी केवळ ओके बोलून पत्रकार परिषद संपवली.

Similar News