मुंबईत निर्बंध आणखी कडक, पोलिसांनी जारी केले आदेश

Update: 2021-12-31 09:45 GMT

कोरोनाच्या अत्यंत वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध वाढवले आहेत,  हे निर्बध १५ जानेवारी पर्यंत लावण्यात आले आहेत. तसेच स्थानिक प्रशासनाने तिथल्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आता नागरिकांसाठी आणखी काही निर्बंध जारी केले आहेत. यानुसार नागरिकांना संध्याकाळी ५ ते सकाळी ५ या वेळेत समुद्र किनारे, खुली मैदानं, बगीचे, पार्क किंवा अशा स्वरुपाच्या सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दुपारी १ वाजल्यापासून हे नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचबरोबर लग्नाला उपस्थित राहणाऱ्या लोकांची संख्या ५० पेक्षा जास्त असताना कामा नये असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही नागरिकांच्या उपस्थितीवर मर्यादा आणत ही संख्या ५० पेक्षा जास्त असता कामा नये असेही पोलिसांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

Tags:    

Similar News