Odisha train accident : ओडिशात रेल्वे अपघात, 233 पेक्षा अधिक मृत्यू तर 900 प्रवासी जखमी

Orisa rail accident : ओडिशामध्ये कोरोमंडल एक्सप्रेसचा (coromandal express accident) अपघात झाला. या अपघातात ५० जणांचा मृत्यू तर १३२ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ओरिसाच्या बलासुरजवळ (balasur) कोरोमंडल एक्स्प्रेस एक्सप्रेसने मालगाडीला धडक दिली. त्यानंतर स्लीपरचे ३ कोच वगळता इतर कोच रुळावरून घसरले. त्यामुळे या अपघातात ५० पेक्षा जास्त प्रवाशांच्या मृत्यूची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Update: 2023-06-03 02:30 GMT

हावडावरून चेन्नईच्या (hawrah chennai) दिशेने निघालेली कोरोमंडल एक्स्प्रेस ओरिसातील बलासुरपासून ४० किलोमीटरवर असताना एका मालगाडीला धडकली. त्यानंतर sleeper coach चे तीन डबे वगळता इतर डबे रुळावरून घसरले. त्यातच हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये २३३ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच १३२ जण गंभीर असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

या अपघातानंतर रेल्वेने आपत्कालीन help line number जारी केले आहेत.

  • Derailment of 12841 Shalimar - Chennai Coromandel Express
  • Howrah Helpline Number: 033-26382217
  • Kharagpur Helpline Number: 8972073925 & 9332392339
  • Balasore Helpline Number: 8249591559 & 7978418322
  • Shalimar Helpline Number: 9903370746

या अपघातानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (rail minister) यांनी ट्विट केले आहे. यामध्ये म्हंटले आहे की, ज्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटूंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. तसेच जे जखमी आहेत ते लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करतो.

यानंतर अश्विनी वैष्णव (ashwini vaishnav)यांनी मृतांच्या कुटूंबाला १० लाख, गंभीर जखमी असलेल्यांना २ लाख तर किरकोळ जखमी असलेल्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली.

बलासूर येथे घडलेल्या रेल्वे अपघातामुळे मला धक्का बसला. वास्तवतः ही भयंकर दुर्घटना आहे. या ठिकाणी ओरिसातील राजस्व मंत्र्यांनी भेट दिली आहे. या अपघातातील बाचावसंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाला आदेश देण्यात आले आहेत.

ओरिसातील रेल्वे अपघाताने मी प्रचंड व्यथित झालो आहे. या अपघातातील मृतांबद्दल संवेदना व्यक्त करतो. तसेच जखमींना लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करतो. (Narendra Modi)


Full View

Tags:    

Similar News