शिवसेनेला पांठीबा देण्याचा कोणाताही प्रस्ताव नाही – शरद पवार

Update: 2019-11-04 14:21 GMT

रविवारी शरद पवार दिल्लीत दाखल झाले होते. आणि आज त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेउन पंत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार म्हणाले महाराष्ट्रातील राजकीय पार्श्वभुमीवर चर्चा झाली. महाराष्ट्रात जनतेनं महायुतीला बहुमत दिले तरी देखील अजुन सत्ता स्थापन झालेली नाही. म्हणून ज्यांना जनादेश मिळाला आहे त्यांनी सत्ता स्थापन करावी.

त्याचप्रमाणे शिवसेनेला पांठीबा देण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. तसचं शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होईल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होतील अशी चर्चा रंगली होती. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही असं म्हणत शरद पवारांनी या चर्चेला पुर्ण विराम दिला आहे.

Similar News