BHR घोटाळा : एकनाथ खडसे यांचा रोख कुणाकडे?

Update: 2021-06-18 07:38 GMT

जळगाव- बीएचआर घोटाळा प्रकरणी आता कारवाईसाठी कुणाचे नाव आहे हे माहिती नाही, परंतु जे कोणी यामध्ये संबंधित असतील त्याची चौकशी होईल, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. यामध्ये लहान असो की मोठा असो हा काही राजकीय विषय नाही याची चौकशी झाली पाहिजे, असेही खडसे यांनी म्हटले आहे. बी एच आर मल्टीस्टेट सोसायटी मध्ये कोट्यावधीचा घोटाळा झाला. या घोटाळ्याची चौकशी ईओडब्ल्यूकडून करण्यात यावी, अशी मागणी एड. किर्ती पाटील यांनी 2018 मध्ये केली होती. पण मधल्या कालखंडामध्ये चौकशीला वेग घेऊ शकला नाही. आता अनेक गोष्टी समोर यायला लागल्या आहेत. शेकडो ठेवीदारांच्या ठेवी काही लोकांनी नाममात्र दरामध्ये घेतल्या. काही ठिकाणी तर बनावट कागदपत्रांचा वापर केला गेला आहे, काही ठिकाणी तारण नसताना कर्ज घेतलं गेलं आणि पात्रता नसतानाही 5 कोटीचे कर्ज दिलं गेलं, असे अनेक आरोप खडसे यांनी केले आहे. हा राजकीय विषय नसून हजारो ठेवीदारांचा पैसा अडकला आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे असे खडसे यांनी म्हटले आहे.



Tags:    

Similar News