तबलिगी जमातच्या CBI चौकशीबद्दल केंद्रसरकारचे प्रतिज्ञापत्र

Update: 2020-06-05 11:56 GMT

देशात कोरोनाच्या फैलावाला जबाबदार असल्याचा आरोप झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाबाबत सीबीआय चौकशीची गरज नाही, असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केले आहे. मार्च महिन्यात निजामुद्दीन इथे झालेल्या कार्यक्रमात देशासह परदेशातूनही अनेकजण आले होते.

केंद्राने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्र म्हटले आहे की, याप्रकरणी कायद्याप्रमाणे दररोज चौकशी सुरू आहे. वेळेत चौकशी पूर्ण करण्याच्यादृष्टीने काम सुरू आहे, त्यामुळे सीबीआय चौकशीची गरज नाही. तबलिगी जमातच्या या कार्यक्रमाबाबत दिल्ली सरकार आणि दिल्ली पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणाबाबत सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका सुप्रिया पंडिता यांनी दाखल केली आहे.

दरम्यान जमातच्या ट्रस्टच्या माध्यमातून काही संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप झाल्यानंतर सीबीआयने तबलिगी जमात आणि काही अज्ञात लोकांविरुद्ध याआधीच प्राथमिक चौकशी सुरु केली आहे. तर या कार्यक्रम प्रकरणी आधीच काही परदेशी लोक आणि तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना साद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Similar News