कोणत्याही समाजावरील अन्याय अत्याचार सहन केला जाणार नाही: अनिल देशमुख

Update: 2020-06-18 20:08 GMT

महाराष्ट्र राज्य हे कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या राज्यात कोणत्याच समाजावर होणारे अन्याय, अत्याचार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. अशा दोषींविरुद्ध तात्काळ व अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल. असा सज्जड इशारा गृह मंत्री अनिल देशमुख यांनी समाजकंटकांना दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा सांगणारे आपले राज्य असून या राज्यात गोरगरीब, दिनदुबळ्यांवर अन्याय अत्याचार होता कामा नये.

हे ही वाचा:-

परप्रांतीय कामगारांची वापसी सुरु!

ग्रामीण भागात अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करणं खरंच शक्य आहे का?

राज्यात काही ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यातील दोषींविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस विभागाला दिले असल्याचे देशमुख यांनी सांगितले. अशा प्रकारच्या घटना जर राज्यात घडल्या तर पोलिसांनी तात्काळ पुढील कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश पोलीस विभागाला दिले असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.

Similar News