राहुल गांधी यांना तत्काळ दिलासा नाही, सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख

Update: 2023-07-21 06:58 GMT

राहुल गांधी यांनी मोदी समाजाचा अपमान केल्याप्रकरणी त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकी दरम्यान मोदी आडनावाचे सगळे चोर कसे असतात, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती. त्याप्रकरणी गुजरात चे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांची सुरत न्यायालयात तक्रार केली होती. त्याप्रकरणी सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवले. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्याविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र गुजरात उच्च न्यायालयानेही राहुल गांधी यांना दोषी ठरवले. त्यामुळे राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी आर गवई, पीके मिश्रा यांनी सुनावणी घेतली. त्यावर महेश जेठमलानी विरुद्ध अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने राहुल गांधी यांना तत्काळ दिलासा देण्यास नकार दिला. तसेच पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

दरम्यान युक्तीवाद करताना अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, निर्णय घेण्यास उशीर झाला तर पावसाळी अधिवेशनात राहुल गांधी यांना सहभागी होता येणार नाही,

Tags:    

Similar News