...तर कोरोनाचा उद्रेक अटळ - तुकाराम मुंढे

Update: 2020-06-22 02:57 GMT

नागपूरमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली. पण त्यानंतर सत्ताधारी भाजप आणि विरोधातील काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी मुंढे यांनाच लक्ष्य केल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी फेसबुकच्या माध्यमातून नागपूरकरांना इशारा दिला आहे.

कोरोनाचा नागपुरात प्रवेश झाल्यानंतर २३ मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले. या काळात आवश्यक त्या सर्व खबरदारी घेण्यात आल्या. शहराच्या आरोग्यासाठी काही कठोर निर्णयही घेण्यात आले. परिणामी ३१ में पर्यंत नागपुरात बाधितांची संख्या आटोक्यात होती.

१ जूनपासून 'अनलॉक १' सुरू झाले. अनेक बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली. मात्र हे करीत असताना शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करावे, असे नागरिकांना बजावण्यात आले होते. सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयात असताना मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावेत, दुचाकीवर केवळ एक व्यक्ती आणि चार चाकी वाहनात वन प्लस टू हे नियम प्रत्येकाने पाळले तर कोरोनाचे संक्रमण रोखता येईल.

मात्र, केवळ काही अपवाद वगळता सर्रास या नियमांचा भंग केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी नागपूर शहरात १ जूननंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाटयाने वाढ झाली. इतकी की आज या आकड्याने हजारी गाठली. नागरिकांची ही बेपर्वाई इतर नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहे. अजूनही वेळ गेली नाही. विनाकारण घराच्या बाहेर निघू नका. नियम पाळा. कोरोनाची साखळी खंडित करण्यास प्रशासनाला मदत करा, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

Similar News