निर्मला सितारमण यांच्या तिसऱ्या पॅकेजमधील 10 मोठ्या घोषणा…

Update: 2020-05-15 12:13 GMT

आज अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेज च्या संदर्भात तिसऱ्या पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजमध्ये शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधेसाठी 1 लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं असून जीवनावश्यक वस्तूमधून कांद्यासह इतर काही पदार्थ हटवले आहेत.

कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधेसाठी 1 लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर

कृषीपुरवठा साखळीसाठी अतिरीक्त 500 कोटी

मधुमक्षिकापालनासाठी 500 कोटी रुपयेभाजीपाला पुरवठ्यासाठी 'ऑपरेशन ग्रीन',

भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी 50 टक्के अनुदान

मधुमक्षिकापालनासाठी 500 कोटी रुपये, 2 लाख मधुमक्षिकापालकांना लाभ होईल

वनौषधींसाठी 4 हजार कोटी

फळ प्रक्रिया उद्योगासाठी 10 हजार कोटी

मत्स्यसंपदा योजनेसाठी 20 हजार कोटी

पाळीव प्राणी लसीकरणासाठी 13 हजार 343 कोटी

दुग्धव्यवसाय पायाभूत सुविधांसाठी 15 हजार कोटी

लॉकडाउनच्या काळात भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन’

लॉकडाऊन मध्ये दुधाची मागणी घटली...

या कालावधीत दुधाची मागणी 20-25% कमी झाली आहे. त्यामुळं सरकार 2020-21 मध्ये दुग्ध सहकारी संस्थांना वार्षिक 2% दराने व्याज सवलत देणार. या योजनेचा 2 कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार

कोरोना व्हायरस च्या काळात सरकारने 74,300 कोटींपेक्षा जास्त किंमतीची किमान आधारभूत खरेदी केली. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत 18,700 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6,400 कोटी रुपये दिले..

शेती, मत्स्यपालनासह त्यासंबंधित कामे करणाऱ्या व्यक्तींसाठी पॅकेज

लॉकडाऊनदरम्यान 74 हजार 300 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले, यातील 18700 कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले...

Similar News