Video: जेव्हा Live वृत्त सांगताना Anchor चा दात पडतो...

Update: 2020-07-18 04:38 GMT

Anchor जेव्हा लाईव्ह टीव्ही मध्ये वृत्त सांगत सांगत असतात, तेव्हा तारेवरची कसरत असते. अचानक एखादी बातमी येते. त्या बातमी बाबत कुठलीही माहिती नसताना Anchor त्या बातमीबाबत सर्व काही माहिती आहे. अशा स्वरुपात ती बातमी मांडत असतो. खरं तर हे त्या Anchor आणि पडद्यावर न दिसणाऱ्या टीमचं ते कसब असतं.

मध्यंतरी एका वृत्त निवेदिकेने आपल्या नातेवाईकांचा अपघातात मृत्यू झाल्यातं Live वृत्त वाचलं होतं. त्यामुळं News Anchor ला भावनिकता बाजूला ठेवून वृत्त द्यावं लागतं.

सध्या युक्रेनियन च्या एका Anchor चा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून तिचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. ही Anchor News सांगत असताना तिचा दात पडला. मात्र, दात पडलेला असताना देखील तिच्या चेहऱ्यावर तिने कोणत्याही वेदना दिसू न देता... तिने वृत्त सांगणं थांबवलं नाही...

मार्चिका पाडल्को Marichka Padalko असं या Anchor चं नाव असून तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Similar News