कोरोनो संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे नवे निर्बंध

Update: 2021-03-19 12:07 GMT

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन दिवसात तर ४५ हजारांच्यावर रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यासंदर्भातील नवीन नियमावली जाहीर केली आहे. याअंतर्गत राज्यामधील सर्व खाजगी ऑफिसेस आणि आस्थापना अशा दोन्हीमध्ये एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्केच कर्मचारी ठेवण्याची सूचना सरकारने केली आहे. तसेच सर्व सरकारी व निमशासकीय कार्यालयांचे विभाग आणि कार्यालयाच्या प्रमुखांनी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे.

त्याचबरोबर राज्यातील नाट्यगृहे आणि सभागृहांमध्ये देखील 50 टक्केच प्रेक्षक संख्या आणि लोक असावेत असे बंधन घालण्यात आले आहे. तसेच नाट्यगृह आणि सभागृहांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर लोकांनी मास्क लावला असेल तरच प्रवेश देण्यात यावा, तसेच कोरोना सर्व नियम पाळले जात आहेत की नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहे.


Tags:    

Similar News