बाळासाहेबांनी प्रादेशिक अस्मितेचा हुंकार मिरवणारा मराठी माणूस उभा केला : शरद पवार

Update: 2019-11-17 05:39 GMT

आज शिवसेनाप्रमुख(Shivsena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb thackeray) यांचा 7 वा स्मृतीदिन आहे. या स्मृतीदिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आदरांजली वाहली आहे. बाळासाहेबांची आणि शरद पवारांची मैत्री राजकारणामध्ये पक्षा पलिकडं जाऊन नाती कशी जपावीत याचं एक मुर्तीमंत उदाहरण आहे. शरद पवार यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. यामध्ये शरद पवार यांनी प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला असं म्हटलं आहे.

 

Full View

हे ही वाचा...

फडणवीसांची व्हिडीओ पोस्ट करुन बाळासाहेबांना आदरांजली, व्हिडीओच्या एकाही फ्रेम मध्ये उद्धव ठाकरे नाहीत!

पालघर: प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची वरिष्ठांविरोधात रॅगिंगची तक्रार

अवकाळी पावसाने पिचलेल्या शेतकऱ्याच्या दुःखावर राज्यपालांची ८ हजारांची फुंकर

प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला आणि समाजकारणाला अग्रक्रम देणाऱ्या राजकारणाची सिद्धता केली. अमोघ वक्तृत्व आणि मुद्द्याला थेट भिडणारा रोखठोक स्वभाव यामुळेच बाळासाहेबांना अनुयायांचं निरपेक्ष आणि चिरंतर प्रेम मिळालं. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन!

Similar News