कोट्यावधींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना अटक

Update: 2020-02-26 04:32 GMT

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवरील संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेकडून बरखास्त करण्यात आल्यानंतर आता शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या आदेशावरून सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी संचालक मंडळ बरखास्त करुन जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती.

अनिल भोसले, त्यांची नगरसेविका पत्नी रश्मी भोसले यांच्यासह 16 जणांवर शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मध्ये बँकेत 71 कोटी 78 लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

त्यानंतर आज बँकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आमदारासह चौघांना अटक केली आहे. आमदार अनिल भोसले आणि सूर्याजी जाधव, सीईओ पडवळ, चीफ अकाऊंटंट शैलेश भोसले अशी अटक कलेल्या व्यक्तीची नाव आहेत. अनिल भोसले हे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेवरील आमदार आहेत.

गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे. भोसले यांच्यासह अटक करण्यात आलेल्या चौघांनाही बुधवारी दुपारी शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Similar News