कोकणाला वादळाचा फटका, सरकार घरबांधणी करणार : शरद पवार

Update: 2020-06-09 16:30 GMT

'निसर्ग' चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यासह कोकणात कोट्यवधींची वित्तहानी केली. जिल्ह्यात सहा जणांचा यात बळी गेला. घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मान्सून काही दिवसातच सुरू होणार असल्याने लवकरात लवकर घरे बांधण्यासाठी मदत करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आजपासून दोन दिवस शरद पवार रायगड, रत्नागिरीमध्ये दौऱ्यावर आले आहेत. माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन इथल्या पाहणीनंतर श्रीवर्धनमधील आढावा बैठकीत ते बोलत होते.

निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टी लगतच्या बागायतदार,लघु व्यवसायिक, कुकुट पालन व्यवसायिक, मच्छीमार यांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर प्रशासनाने पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, करोनो ग्रस्तांना अन्नधान्याची जी मदत केली होती ती मदत चक्रीवादळात भिजून गेली आहे. शासनाने चक्रीवादळातील नागरिकांनाही तत्काळ मदत म्हणून केरोसिन बरोबर तांदुळ, गहु, डाळीचे वाटप करावेत अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत.

जिल्ह्यातील बड्या कंपन्यामध्ये होत असलेली नोकर कपात यावर बोलताना नोकर कपात न करता स्थानिक व भूमिपुत्रांना रोजगार कसा उपलब्ध करता येईल यासाठी प्रयत्न करावेत असे पवार म्हणाले. सकाळी त्यांनी माणगावमधून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर म्हसळा, दिवेआगर, शेखाडी येथील नुकसानीची पहाणी केली. यावेळी शेतकरी नागरिक यांनीही आपल्या समस्या मांडल्या.

Similar News