शरद पवार यांना कोरोनाची लागण

Update: 2022-01-24 08:46 GMT

एकीकडे राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता राज्याची चिंता वाढवणारी बातमी आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली आहे. "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी काळजी कऱण्यासारखे काही नाही" असे शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहोत, पण संपर्कात आलेल्या सगळ्यांनी स्वतःची टेस्ट करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी, असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे.





कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेl शरद पवार यांनी स्वत: बाहेर पडून कामाला सुरूवात केली होती. त्यानंतर राज्यातील निर्बंध काही प्रमाणात कमी करण्यात आले होते. तसेच गेल्या दोन वर्षात शरद पवार हे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही सहभागी झाले होते. आपल्या प्रत्येक जाहीर कार्यक्रमात शरद पवार हे कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करत असतात. शरद पवार यांनी आपल्याला ट्विट केल्यानंतर तातडीने ते लवकर बरे होवोत अशा स्वरुपाच्या शुभेच्छा अनेकांनी दिल्या आहेत. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही समावेश आहे.

Full View

Tags:    

Similar News