मुंबईत क्रुझवर रेव्ह पार्टी, सुपरस्टार अभिनेत्याचा मुलगा ताब्यात

Update: 2021-10-03 03:25 GMT

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCB ने मुंबईत क्रूझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकला. यामध्ये १० जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबईहून गोव्याला जात असलेल्या जहाजावर रेव्ह पार्टी सुरू होती. या कारवाईमध्ये एका मोठ्या बॉलिवूड सुपरस्टारच्या मुलाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

NCB ने शनिवारी टाकलेल्या छाप्यात कोकेन, चरस आणि एमडी यासारखी ड्रग्स जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणात १० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या या ग्रुपवर इतरही काही सेलिब्रिटी उपस्थित होते अशी माहिती मिळते आहे.

NCBच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. क्रूझवर असलेल्या .लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती. यामध्ये एका बॉलिवूडमधील एका सुपरस्टारच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. पण,श त्याने ड्रग्ज घेतले होते की नाही हे हे अजून समजू शकलेले नाही.

Tags:    

Similar News