21 जानेवारीपासून नवी मुंबई फेस्टला होणार सुरुवात

नवी मुंबईत नवी मुंबई फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. यात 13 राज्यातील नागरिक सहभागी होणार आहेत.

Update: 2023-01-20 08:33 GMT

नवी मुंबईत 21 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान नवी मुंबई फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशभरातील 13 राज्यातील नागरिक सहभागी होणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त या कार्यक्रमाला भेट देणार आहेत.

बेलापूर येथील पार्क हॉटेलमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होणार असल्याची माहिती आर के महापात्रा यांनी केली. नवी मुंबईला भारतातील बेस्ट सांस्कृतिक शहर बनवण्यात यावं, यासाठी या फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील स्थानिक नागरिकांना या फेस्टमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित राहणार आहेत. हा फेस्टिवल 21 जानेवारी रोजी सुरु होणार असून 29 जानेवारीपर्यंत हा फेस्टिवल चालणार आहे. यामध्ये हॉकी टुर्नामेंट प्रमुख आकर्षण असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या फेस्टिवलला उपस्थित राहण्याचे आवाहन आर के महापात्रा यांनी केले.

Tags:    

Similar News