बसमध्ये ग्रंथालय, नवी मुंबई महापालिकेचा अनोखा उपक्रम

Update: 2022-01-24 04:04 GMT

नवी मुंबई – दिवसेंदिवस लोकांमध्ये वाचनाची आवड कमी होत असल्याचे बोलले जाते. पण लोकांमध्ये वाचनाची आवड वाढावी तसेच त्यांना सहजपणे पुस्तकं उपलब्ध व्हावीत यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. पण आता यासाठी नवी मुंबई महापालिकेने एक खास उपक्रम हाती घेतला आहे. महानगरपालिकेने लेट्स रीड फाउंडेशनच्या सहकार्याने एक अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या बसेसमध्ये आता ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. लांब पल्याच्या मार्गांवर धावणाऱ्या बसेसमध्ये प्रवाशांसाठी ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. इंग्रजी, मराठीमधील नामवंत लेखकांची पुस्तके या ग्रंथालयात प्रवाशांच्या वाचनासाठी ठेवण्यात आली आहेत. नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, प्रवास करताना आपला वेळमोबाईल मध्ये न घालवता प्रवाशांना एक उत्तम सोय उपलब्ध व्हावी या दृष्टीने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत या ग्रंथालयाचे उदघाटन रविवारी करण्यात आले. प्रवाशांनी या ग्रंथालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन अभिजीत बांगर यांनी केले आहे.


Full View

Similar News