जिओ, एअरटेल की VI – कोणाचा ARPU सर्वाधिक? गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची माहिती

Jio, Airtel or VI – Who has the highest ARPU? Important information for investors | MaxMaharashtra

Update: 2025-09-05 13:10 GMT

भारतातील टेलिकॉम उद्योग झपाट्याने बदलत आहे. ग्राहकसंख्या वाढत असली तरी कंपन्यांचा नफा किती होतो, हे एका महत्त्वाच्या मापनावर अवलंबून आहे – ARPU (Average Revenue Per User).

ARPU म्हणजे काय?

ARPU म्हणजे प्रति ग्राहक सरासरी उत्पन्न. एखाद्या कंपनीला तिच्या प्रत्येक ग्राहकाकडून सरासरी किती महसूल मिळतो हे यावरून कळते.

ARPU चे सूत्र

ARPU = एकूण उत्पन्न ÷ ग्राहकांची संख्या

एखाद्या टेलिकॉम कंपनीचे मासिक उत्पन्न ₹1,000 कोटी असेल आणि तिचे 10 कोटी ग्राहक असतील,

तर ARPU = 1,000 कोटी ÷ 10 कोटी = ₹100 प्रति ग्राहक.

ARPU चा वापर ?

टेलिकॉम कंपन्या – Jio, Airtel, VI यांचा महसूल मोजण्यासाठी.

OTT प्लॅटफॉर्म्स – Netflix, Disney+ सारख्या सबस्क्रिप्शन सर्विसेस.

गेमिंग व मोबाईल अॅप्स – इन-अॅप खरेदी व जाहिरात महसूल तपासण्यासाठी.

ARPU का महत्त्वाचा?

नफा आणि वाढ समजण्यासाठी – ग्राहक जास्त आहेत पण खर्च कमी करतात तर कंपनीला फायदा होत नाही.

स्पर्धात्मक तुलना – कोणत्या कंपनीचा ARPU जास्त आहे हे पाहून गुंतवणूकदार निर्णय घेतात.

भविष्यातील धोरणे ठरवण्यासाठी – प्लॅन महाग करणे, ऑफर्स देणे किंवा नवीन सेवा सुरू करणे.

भारतातील टेलिकॉम कंपन्यांचा ARPU

Airtel – सर्वाधिक ARPU, सुमारे ₹200+

Jio – सुमारे ₹182

VI (Vodafone Idea) – ₹140 च्या आसपास

कमी ग्राहक असूनही जास्त ARPU मिळवणाऱ्या कंपन्या आर्थिकदृष्ट्या मजबूत मानल्या जातात.

Tags:    

Similar News