राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटाची परवड, 'म्होरक्या'ला महाराष्ट्रात एकही थिएटर नाही

Update: 2020-02-07 05:05 GMT

सध्या दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत नाहीत. किंबहुना हे चित्रपट थिएटर पर्यंत पोहोचतच नाही. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अमर देवकर या तरुणाने दिग्दर्शित ‘म्होरक्या’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले नाहीत. हा चित्रपट 7 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

मात्र, परिस्थितीशी संघर्ष करत उभा राहिलेल्या ‘म्होरक्या’ चित्रपटाला महाराष्ट्रात आज एकही थिअटर मिळालं नाही. निर्माता आणि प्रेझेंटर यांच्यातील वाद आणि समन्वयाअभावी म्होरक्याला थिएटर मिळाले नाही, असा आरोप अमर देवकर यांनी केला आहे. म्होरक्याला महाराष्ट्रात शनिवारी एकूण 35 शो मिळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा...

थिएटरला डीसी बुधवारी न गेल्यामुळे म्होरक्याला थिएटर मिळालं नाही. डीसी गुरुवारी पोहोचली त्यामुळं हा घोळ झाला. मात्र, हा सर्व निर्मात्याच्या हलगर्जीपणा आहे. त्यामुळं चित्रपट महाराष्ट्रातील सर्व थिअटरमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही. असं दिग्दर्शकाचं म्हणणं आहे.

Similar News