मी मुनगंटीवारांना विचारत नाही: नारायण राणे

Update: 2020-05-26 16:59 GMT

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे. ही आपली वैयक्तिक भूमिका असल्याचं राणे यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी स्थिती नसल्याचं म्हटलंय.

भाजपमध्ये राष्ट्रपती राजवटीसंदर्भात एकवाक्यता नाही, असा प्रश्न नारायण राणे यांना एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीदरम्यान विचारला गेला. त्यावर राणे यांनी 'मी मुनगंटीवार यांना विचारात नाही' असं विधान केलंय.

सुधीर मुनगंटीवार यांचं वेगळं मत असू शकतं. मी मुनगंटीवार यांना विचारत नाही. त्यांनी मला काही सांगावं असंही नाही. मी राज्यपाल आणि केंद्र सरकारकडे मागणी केलीय, असं राणे या मुलाखतीत म्हणाले. आम्हालाही राजकीय बोलता येतं पण आम्हाला तशी सवय नाही. मुनगंटीवार भाजपचे ज्येष्ठ नेते असले तरी मी सुद्धा राज्याचा माजी मुख्यमंत्री आहे, असं राणे यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितलं.

त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (सौजन्य ABP माझा)

Full View

Similar News