#BiyaniMurder बियाणी यांच्या घरी निनावी पत्र

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येच्या घटनेला आठ दिवस उलटले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेने पोलीसांची झोप उडाली असून दिवसरात्र एसआयटी, स्थानीक गुन्हे शाखा व ठाण्याचे काही पथके कामकाज करत आहेत. दरम्यान, बियाणी कुंटूंबियांना एक निनावीपत्र आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, याबाबत पोलीसांकडून कोणताही दुजोरा दिला जात नाही.

Update: 2022-04-13 06:15 GMT

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येच्या घटनेला आठ दिवस उलटले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेने पोलीसांची झोप उडाली असून दिवसरात्र एसआयटी, स्थानीक गुन्हे शाखा व ठाण्याचे काही पथके कामकाज करत आहेत. दरम्यान, बियाणी कुंटूंबियांना एक निनावी पत्र आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, याबाबत पोलीसांकडून कोणताही दुजोरा दिला जात नाही.

प्रसिद्ध बांधकाम व्यावासयिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल रोजी भरदिवसा त्यांच्या घरासमोर दुचाकीवरील दोघांनी गोळीबार करुन हत्या केल्याची घटना घडली. या घटनेने नांदेडसह राज्याला हदरा बसला आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे. तसेच विविध पथके हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. तपासासाठी एसआयटी पथक नेमण्यात आले असले तरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, इतर पोलीसांचे पथक प्रयत्नशिल असून या तपासासाठी अधिकारी आणि कर्मचारी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. परंतू, याबाबत पोलीसांच्या हाती अद्यापपर्यंत कोणतेही धागे दोरे सापडले नाहीत. त्यात सोमवारी बियाणी यांच्या घरी निनावी पत्र येउन धडल्याने पोलीसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

...

काय आहे निवावी पत्रात -

दरम्यान, 12 एप्रिल रोजी संजय बियाणी यांच्या घरी आलेल्या एका निनावी पत्राने खळबळ उडाली आहे. हिंदी भाषेतून पाठवण्यात आलेल्या पत्रात, बियाणी साब को ठोकनेका मनसुबा परभणी में हुवा, यासह इतरही काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसते. सध्या बियाणी यांच्या निवासस्थानी पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीसांच्या तपासाची दिशा भरकटवण्यासाठी कुणी जाणीवपूर्वक हे पत्र पाठवले असावे, अशी चर्चा होत आहे.

Tags:    

Similar News