विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड

Update: 2019-12-01 06:24 GMT

ठाकरे (Thackeray) सरकारच्या विश्वास मत ठरावानंतर आज राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. काँग्रेसचे (Congress) आमदार नाना पटोले (Nanabhau Patole) यांची विधानसभेच्या अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

भाजपने (BJP) नाना पटोले यांच्या विरोधात भाजपचे आमदार किसन कथोरे (Kisan Kathore ) यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी अध्यक्षांची निवड बिनविरोध व्हावी. यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत भाजपने सभापतीपदासाठी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली.

हे ही वाचा...

पंकजा मुंडे यांचं ठरलं? राजकीय भूकंपाची शक्यता

अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा देवेंद्र फडणवीसांचा आरोप विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला

महिला सुरक्षेला प्राधान्य, पण सत्तेत सहभाग कुठाय?

दरम्यान विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस आमदार नाना पटोले यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य असलेले नाना पटोले विधानसभा अध्यक्ष होतील. असा विश्वास बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केला होता.

Similar News