तज्ञांची अकराशे पदे रिक्त ! अर्धवेळ डॉक्टरांच्या भरवशावर राज्यातील आरोग्यसेवा !

Update: 2020-02-26 06:47 GMT

राज्यात नागपुर परिमंडळांतर्गत वैद्यकीय व आरोग्य सेवेत मंज़ुर पदाच्या तुलनेत निम्म्याहुन जागा रिक्त आहेत. स्त्री-रोग व प्रसूती तज्ञ तसेच भूलतज्ञ या तीन प्रवर्गात सुमारे पावणे दोनसे डाॅक्टर गरजेपेक्षा कमी आहेत. राज्यात तज्ञ डाॅक्टरांच्या १७०० पदांपैकी ११५२ पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र विधानपरिषदेतील प्रश्नोत्तराच्या चर्चेत ही माहिती समोर आली आहे.

प्रा.अनिल सोले, नागोराव गाणार, रामदास आंबटकर, गिरीशचंद्र व्यास, डाॅक्टर परिणय फुके, प्रकाश गजभिये यांनी आरोग्य सेवेबाबत प्रश्न विचारला होता. नागपूर परिमंडळांतर्गत नागपूर, भंडारा , वर्धा, चंद्रपूर आणि गोंदिया या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सेवेत तज्ञ डाॅक्टरांची नेमणूक करण्याऐवजी अर्धवेळ डाॅक्टरांनवर सरकार काम चालवत आहे असा या सदस्यांचा आरोप होता. २४ तास सेवेऐवजी केवळ तीन ते चार तास डाॅक्टरांची सेवा मिळत आहे असं त्यांचं म्हणंन होतं सरकारने त्याचा इन्कार केला आहे.

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना तज्ञ डाॅक्टरांची कमतरता असल्याचे मान्य केलेआहे. तज्ञ डाॅक्टरांची एकूण ४८५ पदे मजूंर असून केवळ २६४ भरलेली आहेत. फिजिशियन १८ , बाळरोगतज्ञ ५१, जनरल सर्जन १२, स्त्री-रोग व प्रसूती तज्ञ ६०, बधिरीकरण तज्ञ ६८, अस्थिरोग तज्ञ ०३ , नेत्ररोग तज्ञ ०९ अशी एकूण २२१ पदे रिक्त असल्याची माहिती मंत्री महोदयांनी दिले आहेत.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गंत वैद्यकीय अधिकारी व आयपीएचएस अंतर्गत विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानामतर्गंत तात्पुरत्या स्वरूपात तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. तसेच वैद्यकीय अधिकारी गट-अ पदावर कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून एमबीबीएस अर्हताधारक अधिकाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत व रूग्णसेवा सुरळीत ठेवण्यासाठी एमबाीबीएस अर्हताधारक उमेदवारांना एक वर्षाच्या कालावधीसाठी बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी गट-अ पदावर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. असं उत्तर राजेश टोपे यांनी दिलं आहे.

Similar News