#कोरोनाशी_लढा - धारावीमध्ये सुधारणा पण मुंबईतला हा भाग बनला हॉटस्पॉट

Update: 2020-06-23 02:01 GMT

कोरोनाच्या संकटाच्या सुरुवातीच्या टप्प्यात वरळी आणि धारावी हे मुंबईतील दोन भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. पण आता धारावी आणि वरळीमधली परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येऊ लागलेली आहे. इथे रुग्णांची संख्या कमी होत आहे.

मुंबईतील के पूर्व वॉर्ड आता कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असल्याचे महापालिकेने वॉर्डनुसार जाहीर केलेल्या माहितीमधून उघड झाले आहे. के वॉर्डमध्ये अंधेरी आणि जोगेश्वरी या भागांचा समावेश होतो. या भागात जवळपास 70 टक्के भागांमध्ये लोक दाटीवाटीच्या वस्तीमध्ये राहतात.

के ईस्ट वॉर्डमध्ये आतापर्यंत कोरोनाबाधित 4 हजार 578 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 2 हजार 085 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत तर कोरोनाच्या ॲक्टिव रुग्णांची संख्या 2 हजार 228 एवढी आहे.

हे ही वाचा..

देव तारी त्याला कोण मारी? कोविड रुग्णालयात महिलेने दिला बाळाला जन्म

राज्यात कोरोना च्या चाचण्या वाढणार, ‘हे’ आहे कारण…

अजित दादा म्हणतात… ‘घरात रहा, खेळत रहा, तंदुरुस्त रहा!’

दरम्यान केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार धारावी मध्ये एप्रिल मध्ये असलेला रुग्ण वाडीचा 12 टक्के तर हा आता 1.2 टक्क्यांवर येऊन पोहोचलेला आहे महापालिकेने वेळेस केलेल्या उपाययोजनांमुळे हा दर कमी करण्यात यश आल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटलेला आहे. मुंबईत आतापर्यंत 66 हजारांच्यावर कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

Similar News