मुंबई लोकल 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरु...

मुंबई लोकल 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरु मात्र, वेळेची अट, काय आहेत या वेळा वाचा...

Update: 2021-01-29 09:13 GMT

साधं गुगल वर 'लोकल' असा शब्द टाकला, तर त्या खाली गुगल 'लोकल ट्रेन कब से चलेगी' असं सुचवतं. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. मुंबईची लाईफलाइन असलेली लोकल सर्व सामान्य लोकांसाठी सुरु होणार आहे. येत्या 1 फेब्रवारीपासून मुंबईची लोकल सर्वसामान्य मुंबईकरांसाठी सुरु करण्यात आली आहे. मात्र, सर्व सामान्य प्रवाश्यांसाठी एका ठरावीक वेळेचं बंधन रेल्वे विभागानं घालून दिलं आहे.

कोणत्या वेळेत करू शकता प्रवास?

तीन टप्प्यात सर्वसामान्य नागरिक प्रवास करु शकतात...

मुंबईच्या कोणत्याही रेल्वे लाइनवरून सुरू झालेली पहिली लोकल ते सकाळी 7 वाजेपर्यंत

दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत

रात्री 9 ते शेवटच्या लोकलपर्यंत

म्हणजे इतर वेळेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करू शकतात.

दुकानं/आस्थापना, रेस्टॉरंटचं काय?

रात्री 11 वाजेपर्यंत दुकानं आणि आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी आहे. तर रेस्टॉरंट रात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहतील.

Tags:    

Similar News