एमपीएससीने काढली आजवरची सर्वात मोठी भरती ,८१६९ पदे भरण्यात येणार.

Update: 2023-01-21 06:21 GMT

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार पदाची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे एमपीससीने ने आजवरची सर्वात मोठी भरती काढली आहे . एमपीएससीकडुन ८१६९ पदांच्या भरती प्रकिया राबवली जाणार आहे.

महाराष्ट्रात बेरोजगार तरुणासाठी आनंदाची बातमी आहे, कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीससीने आजवरची सर्वात मोठी भरती काढण्यात आली . महाराष्ट्र लोकसेवा आयोग ८१६९ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब आणि क संवर्गातील ही पदे भरण्यात येणार आहेत .संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन 30 एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्हा केंद्रावर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कक्ष अधिकारी ७८ ,राज्य कर निरीक्षकची १५९, पोलीस उप निरीक्षकची ३७४, दुय्यम निबंधकची (मुद्रांक निरीक्षक) ४९, दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क)ची ६, तांत्रिक सहाय्यकचे १, कर सहाय्यकची ४६८ आणि लिपिक टंकलेखकची ७०३४ पदासाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत . गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे. तर गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे.

महत्त्वाची तारख्या ....

- अर्ज करण्याची मुदत = १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी

- ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची मुदत = १४ फेब्रुवारी

- भारतीय स्टेट बॅंकेत चलनाची प्रत देण्याची मुदत = १६ फेब्रुवारी

- चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत =१९ फेब्रुवारी

- संयूक्त पूर्व परीक्षा २०२३ = ३० एप्रिल

- गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा = २ सप्टेंबर २०२३

- गट क संयुक्त मुख्य परीक्षा = ९ सप्टेंबर २०२३

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदसंख्या

१) सहायक कक्ष अधिकारी= ७० (मंत्रालय) , ८ (लोकसेवा आयोग)

२) राज्य कर निरीक्षक = १५९

३) पोलीस उपनिरीक्षक = ३७४

४) दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक = ४९

५) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क = ०६

Tags:    

Similar News