त्या आदिवासी कुटूंबाला स्वखर्चाने २ एकर जागा देणार, खासदार राजेंद्र गावित यांचे आश्वासन

Update: 2021-08-24 13:56 GMT

पालघर जिल्ह्यामधील मोखाडा तालुक्यातील आसे गावात राहणारे मृत आदिवासी शेतमजूर काळु पवार यांच्या कुटुंबियांची खासदार राजेंद्र गावित यांनी मंगळवार (२४ ऑगस्ट)ला सांत्वनपर भेट घेतली. "एकीकडे देश अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. तर दुसरीकडे वेठबिगारीच्या पाशात अडकलेल्या कातकरी शेतमजूराला, मालकाच्या जाचाला कंटाळून अवघ्या ५०० रुपयांसाठी आत्महत्या करावी लागते ही दुर्दैवी बाब आहे", असे खासदार राजेंद्र गावित यांनी म्हटले आहे.

काळू पवार यांच्या पिडीत कुटूंबाला आतापर्यंत २५ हजाराची रोख मदत शिवाय अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत. तसेच या कुटूंबाला कायमस्वरूपी रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी २ एकर जागा स्वखर्चाने घेऊन देणार असल्याचे आश्वासन खासदार राजेंद्र गावित यांनी यावेळी दिले.

"या आदिवासी कुटुंबाची घरकुल योजनेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा त्यांच्या मुलांना आदिवासी आश्रम शाळेत दाखल करुन घ्या. आदिवासी विभागाकडून मिळणाऱ्या मदतीची तातडीने तरदूत करा.", अशा सुचना खासदार गावित यांनी उपस्थित प्रांत अधिका-यांना दिल्या आहेत.

Tags:    

Similar News