विनोद तावडेंच्या ‘त्या’ व्हिडीओवरुन छत्रपती संभाजीराजेंचा संताप...

Update: 2019-08-19 11:55 GMT

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे तसंच खासदार गोपाळ शेट्टी यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी भाजपच्यावतीने बोरिवली विधानसभा मतदारसंघात मदतफेरी काढून मदतीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांच्या सोबत बोरिवली विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, पुरग्रस्तांसाठी मागितलेली अशा पद्धतीने मागितलेली मदत आम्हाला नको. असं म्हणत खासदार संभाजी राजे भोसले यांनी ही पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही अशा शब्दात तावडेंना सुनावले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या संभाजी राजे भोसले यांची राष्ट्रपतींनी राज्य़सभेवर खासदार म्हणून नियुक्ती केली आहे. संभाजी राजे हे चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात.

दरम्यान या व्हिडीओ वरुन नेटीझन्सने देखील तावडेंना चांगलेच सुनावले होते. त्यानंतर छत्रपती संभाजी राज यांनी तावडेंना सुनावल्याने हा भाजपला घरचा आहेर मानला जात आहे.

स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव ते काय? मी हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही. सर्वसामान्य महाराष्ट्रवासीयांचे प्रेम, कोल्हापूर, सांगलीकरांनी मनापासून स्वीकारलं आहे.

 

Full View

 

Similar News