आज मुंबईत पाऊस दाखल होणार

Update: 2019-06-25 07:04 GMT

मान्सून मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आला असून, मंगळवारी तो मुंबईत दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, येत्या ४८ तासांत मान्सून मध्य अरबी समुद्र, कोकण, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये दाखल होईल. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र येथे चांगला पाऊस पडत आहे.

मान्सून मुंबईत मंगळवारी दाखल होण्याची शक्यता असून मंगळवारी आणि बुधवारी मुंबई आणि आसपासच्या प्रदेशात हवामान ढगाळ राहणार आहे. तसेच शहर, उपनगरात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Similar News