महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, मान्सून महाराष्ट्रात धडकला...

Update: 2021-06-05 16:03 GMT

केरळ आणि कर्नाटकमधून पुढे सरकत मान्सून आता महाराष्ट्रात पोहोचला आहे. (Monsoon Maharashtra) महाराष्ट्रात आज शनिवारी दक्षिण पश्चिम मान्सूनचं आगमन झालं आहे. यामुळे समुद्र किनाऱ्यावरील काही भागात पाऊस देखील पडला आहे. भारतीय हवामान खात्यानं (IMD) ही माहिती दिली आहे.

हवामान खात्याचे निर्देशक शुभांगी भुते यांनी वेळेनुसार

दक्षिण पश्चिम मान्सून (South West Monsoon) महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती दिली आहे.

'मान्सून आज‌ महाराष्ट्रात दाखल झाला. मान्सून रेषा राज्यात द.कोकणात हर्णेपर्यंत तसंच द.मध्य महाराष्ट्रात सोलापूरपर्यंत आहे. मराठवाड्याचा काही सलग्न भाग असून परिस्थिती पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल आहे' अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे.


यंदा मान्सून 10 जूनला दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्या अगोदरच मान्सूनने हजेरी लावली आहे.

Tags:    

Similar News