मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा, या 14 पिकाचं समर्थन मूल्य वाढवलं...

Update: 2020-06-01 15:16 GMT

देशात अलिकडच्या काळात निर्माण झालेल्या संकटामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे. मोदी सरकार ने 20 लाख कोटीच्या पॅकेज मध्ये शेतकऱ्यांना विविध योजना देण्याचा प्रयत्न केला आहे. आज मोदी सरकार 2 ला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर च्या पहिल्याच मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंत्रीमंडळाने १४ खरीप पिकांचं किमान समर्थन मूल्य (MSP) ५०-८० टक्के वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्या पिकाचं समर्थन मुल्य वाढवलं?

चालू आर्थिक वर्षासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धानाचं किमान समर्थन मूल्य MSP वाढवून १८६८ रुपये प्रति क्विंटल करण्यात आलं आहे.

बाजरीचं समर्थन मूल्य २१५० रुपये प्रति क्विंटल करण्यात आलं आहे. तर जव (बार्ली)चं समर्थन मूल्य MSP २६२० रुपये करण्यात आलं आहे.

तर दुसरीकडे नाचणी, मूग, शेंगदाणे, सोयाबिन, तीळ आणि कापसाचं किमान समर्थन मूल्य ५० टक्क्यांनी वाढवलं आहे.

Similar News