मोदी बोलणार म्हटल्यावर धडकी का भरते ?

8 पीएम.. मोदी बोलणार? म्हटल्यावर अनेकाचं काळीज धडधडतं.. सोशल मिडीयावर प्रतिक्रीयांचा पाऊस पडतो. आजही तसेच झालेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं.'आज मी संध्याकाळी 6 वाजता देशाला संबोधित करणार आहे. मी माझ्या देशवासियांना एक संदेश देणार आहे. आपणही सामील व्हा.' नोटबंदीपासून सुरु झालेल्या मोदींच्या या संदेशाची धडकी आणि खिल्ली उडवण्याचा सिलसिला सुरु होण्यामागचे विश्लेषन पहा मॅक्स महाराष्ट्रवर.......

Update: 2020-10-20 10:12 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता देशाला संबोधित करणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वपूर्ण घोषणा करून देशातील जनतेला सूचना देऊ शकतात. कोरोना व्हायरसविरूद्ध सुरू असलेल्या युद्धाबद्दल देशातील लोकांना संबोधीत करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, 'आज मी संध्याकाळी 6 वाजता देशाला संबोधित करणार आहे. मी माझ्या देशवासियांना एक संदेश देणार आहे. आपणही सामील व्हा.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला काय संदेश देणार याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. सोशल मिडीयात याबाबत मिम्स देखील व्हायरल झाले आहे. नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर 2016 रोजी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करुन 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर देशभरात अराजकता सदृश्य परीस्थिती निर्माण झाली होती. भारतात कोरोना संक्रमण सुरू झाल्यापासून पंतप्रधानांनी बर्‍याच वेळा राष्ट्राला संबोधनले आहे. मार्च महिन्यात याची सुरूवात झाली होती. 19 मार्च रोजी त्यांनी जनता कर्फ्यूसाठी लोकांना आवाहन केले.

यानंतर, 24 मार्च रोजी देशाला दिलेल्या भाषणात त्यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. नंतरच्या देशाला संबोधित करताना त्यांनी स्वावलंबी भारत अभियानासाठी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. १९ मार्च रोजी मोदींनी 'जनता कर्फ्यू'ची घोषणा केली होती. त्यानंतर 24 मार्च रोजी मोदींनी 21 दिवसांचं पहिलं लॉकडाऊन जाहीर केलं होतं. 14 एप्रिल रोजी पहिलं लॉकडाऊन संपलं, मात्र कोरोनाचा प्रसार वाढत जात होता. त्यामुळे 14 एप्रिल रोजी मोदींनी पुन्हा 14 दिवसांनी लॉकडाऊन वाढवला.

त्यानंतर 12 मे रोजी मोदींनी पुन्हा देशाला उद्देशून भाषण केलं आणि त्यात त्यांनी 'आत्मनिर्भर भारत' योजनेची घोषणा केली होती. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांनी 20 लाख कोटींचं आर्थिक पॅकेज घोषित केलं होतं. त्यानंतर 30 जून रोजी मोदींनी देशाला उद्देशून भाषण केलं आणि त्यात कोरोनाबाबत बेजबाबदार वागणाऱ्या नागरिकांना सुनावलं होतं.अनलॉक करताना सोशल डिस्टंन्सिंग आणि मास्क वापरणं किती महत्त्वाचं आहे, हे मोदींनी सांगितलं होतं. आता आज मोदी काय बोलणार, ते आजही कोरोनावर बोलणार की आणखी दुसऱ्या कुठल्या विषयावर बोलणार, हे पाहावं लागेल. एकंदरीत मोदींचं देशाला होणारं संबोधनावरुन तर्तवितर्क केलं जात असताना आज सहाच्या संबोधनावरुन अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. हे मात्र नक्की.

Full View

Tags:    

Similar News