NRCच्या धर्तीवर SRC करा - मनसे

Update: 2020-01-23 09:44 GMT

एनआरसीच्या धर्तीवर प्रत्येक राज्यात एसआरसी अर्थात स्टेट सिटीझन रजिस्टर असावं अशी मागणी मनसेनं आज केलीय. मनसेचं मुंबईत पहिलं महाअधिवेशन सुरू आहे.या अधिवेशनात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ही मागणी केलीये.

या व्यासपीठावरुन मनसेनं पुन्हा एकदा परप्रांतियांचा मुद्दा उपस्थित केला आहे. दूसरिकडे एनआरसी कायद्याच्या समर्थनाची भूमिका मनसेनं घेतली असल्याचं या निमीत्तानं स्पष्ट झालंय.

केईएम हॉस्पिलमध्ये १२०० खाटा असताना देशभरातून इथं दररोज ३२ हजार पेशंट येतात, त्यामुळे मुंबईच्या आरोग्याचं नियोजन बिघ़डत असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे इतर राज्याने हॉस्पिटल उभारले नाहीत याचा दंड महाराष्ट्राने का सहन करावा असा सवालही देशपांडे यांनी केला. मनसेनं या संदर्भात अधिवेशनात ठरावही मांडलाय. राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांना शोधून काढून त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठवण्याची मागणी मनसेनं केलीय. त्यामुळे मनसे परप्रांतियांच्या अजेंड्यावर पुन्हा आक्रमक होणार हे स्पष्ट झालंय.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/915024092227696/?t=0

दरम्यान या अधिवेशनात चोरट्यांनी आपलं काम बजावल्याचं सिद्ध झालंय. राज्यव्यापी अधिवेशनामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झालाय, मात्र याचा फायदा उचलण्यात चोरटे मागे राहीले नाहीत. अधिवेशनासाठी गोरेगावच्या संकुलात राज्यातून शेकडो मनसे कार्यकर्ते दाखल झालेत. याचा फायदा उचलत, खिसेकापू,चोरट्यांनी आपले हात साफ केलेत. अनेक कार्यकर्त्यांनी मोबाईल, सोन्याची चेन गायब झाल्याच्या तक्रारी केल्यात. त्यामुळे अखेर ५ मोबाईल आणि एक सोन्याची चेन हरवल्याची उद्घोषणा स्टेजवरुन संयोजकांना करावी लागली आहे. या गर्दीत एक लहान मुलगा हरवल्याची घोषणा स्टेजवरुन केली गेली.

 

Similar News