पुरस्कार देण्यासाठी घाई का? मनसेचा आक्षेप

Update: 2020-01-26 08:08 GMT

पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी करणाऱ्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली. सरकारने जाहीर केलेल्या यादीतील नागरिकांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. पद्मश्री पुरस्कारासाठी भारताचे नागरिकत्व घेतलेला गायक अदनान सामीचं नाव पुढे आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर आक्षेप घेतला असून अदनानला इतक्या लवकर पद्म श्री देण्याच्या निर्णयावर भाष्य केलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सतत पाकीस्तानी कलाकारांच्या विरोधात असते. आणि आता पाकिस्तानी वंशाचा आणि चार वर्षापुर्वी भारतीय नागरिकत्व स्विकारलेला अदनानसामीला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी इतक्या लवकर पद्म श्री पुरस्कार देण्याची घाई का केली असा प्रश्न विचारला आहे. भारताचं नागरिकत्त्व घेऊन अदनानला काही वर्ष उलटली असून त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.

काल पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर गायक अदनान सामीने केंद्र शासनाचे आभार मानत ट्वीट केलं. कोणत्याही कलाकारासाठी हा एक अविस्मरणीय क्षण असतो. पद्मश्री पुरस्कारासाठी माझा विचार केल्याबद्दल मी सर्वाचा ऋणी आहे. अशा प्रकारे ट्वीटरच्या माध्यमातून अदनान सामींनी आपले मत व्यक्त केलं आहे.

Similar News