मनसेच्या झेंड्यावरुन वाद, राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा -संभाजी बिग्रेड

Update: 2020-01-23 10:17 GMT

आज शिवसेनाप्रमुख (shivsena) बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांची जयंती. या जयंतीचं निमित्त साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी त्यांच्या पक्षाचा झेंडा बदलला. मनसेच्या नव्या झेंड्याचा रंग भगवा असून या झेंड्याच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या स्वराज्याची राजमुद्रा आहे. शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, मनसेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade ) ने केली आहे. या संदर्भात त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये निवेदन दिलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी प्रशासनाचं प्रतिनिधित्व करणारी ही राजमुद्रा रयतेच्या राज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करणारी आहे. राजकीय पक्षानं तिचा वापर करणं चुकीचं आहे. असं मत संभाजी ब्रिगेड ने व्यक्त केलं आहे.

आज मुंबईत मनसेचं पहिलं अधिवेशन होत आहे. त्या निमित्ताने राज्यभरातून मनसे कार्यकर्ते अधिवेशनात दाखल झाले आहेत. तसंच राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि मनसेचे अन्य पदाधिकारीही गोरेगावमधल्या नेस्को संकुलात दाखल झाले आहेत. या कार्यक्रमात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे य़ांची मनसे नेते पदी निवड करण्यात आली आहे

 

Similar News