Bharat Ratna : मनसेकडून लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कारासाठी अभिनंदन

Update: 2024-02-03 10:00 GMT

Mumbai : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thaackeray) यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lalkrishna Advani )यांना भारतरत्न (Bharatratn Award) पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. राज ठाकरे यांनी ट्वीट करत हि माहिती दिली आहे.

राज ठाकरे हे ट्विट करत म्हटले आहे की, "(BJP)भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाच्या प्रमुख संस्थापकांपैकी एक लालकृष्ण अडवाणीजी यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान घोषित झाला ह्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. केंद्र सरकारचं देखील अभिनंदन.

"करोडो भारतीयांचं आणि अनेक पिढ्यांचं, राममंदिराचं स्वप्न पूर्ण झालं, त्यात मोलाचा वाटा हा अडवाणीजींचाच, आणि हे करताना त्यांनी स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावली, राजकीय अस्पृश्यता आणि उपेक्षा सहन केली. रथयात्रेतून अडवाणीजींनी देशातील हिंदूंची अस्मिता जागृत केली आणि भारतीय जनता पक्षाचा उदय झाला, पण हे करताना 'अब की बारी अटलबिहारी' म्हणण्याइतका मनाचा मोठेपणा हा अडवाणीजींकडे होता," असेही ठाकरे म्हणाले.

"देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आजपर्यंतच राजकारण पाहिलेले आणि देशातील राजकारणाला वळण देणाऱ्या ह्या ज्येष्ठ नेत्याचं ह्या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे(MNS) मनापासून अभिनंदन !" असे ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Tags:    

Similar News