घुसखोर कळवा, ५ हजार मिळवा; बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मनसेची नवी मोहीम

Update: 2020-02-28 04:51 GMT

बांग्लादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता घुसखोरांची माहिती देणाऱ्या बक्षीस जाहीर केलंय. आधी औरंगाबाद आणि आता मुंबईमध्ये पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांची माहिती देणाऱ्यांना मनसे ५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस देणार आहे. याबद्दलचं एक पोस्टर ‘मातोश्री’च्या परिसरातही लावण्यात आलंय.

‘घुसखोर कळवा, बक्षीस मिळवा! पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हिंदुस्थानातून हाकललंच पाहिजे. या मोहिमेत समोर आलेल्या माहितीची शहानिशा करुन सत्यता पटल्यावर माहिती देणाऱ्याच रोख ५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस दिले जाईल. माहिती देणाऱ्याचे नाव या संपूर्ण प्रक्रियेत गुप्त ठेवण्यात येईल’ असं मनसेच्या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.

घुसखोरांविषयी माहिती देण्यासाठी औरंगाबादच्या आकाशवाणी चौकात मनसेनं विशेष स्टॉल उभारला आहे.

 

Similar News