चंद्रकांत पाटील यांना आपल्या संस्कृतीचा विसर पडला - आमदार रोहित पवार

Update: 2021-10-18 16:51 GMT

आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे , आपल्यापेक्षा वयाने मोठी वा अनुभवी असलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दल आपण एकेरी अथवा आक्षेपार्ह बोलत नसतो परंतु राज्याच्या राजकारणात चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी जो उल्लेख केला, तो चुकीचा आहे. त्यांना त्यांच्या संस्कृतीचा विसर पडलाय की काय? असा प्रश्न लोक उपस्थित करत आहेत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे, नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

देगलूर बिलोली मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे देखील यावेळी आमदार पवार म्हणाले.

दरम्यान भाजप खासदार डॉ. सुजय विखे आणि पार्थ पवार यांच्या विमान प्रवासाची चर्चा राज्यात चर्चिली जात आहे. या प्रश्नावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, ही एक चांगली गोष्ट आहे ,की राज्यातल्या दोन वेगवेगळ्या पक्षातील नेते एकत्र प्रवास करीत आहे , या ४० मिनिटांच्या प्रवासात त्यांनी खूप सकारात्मक चर्चा केली असणार अशी आशा आहे असं ते म्हणाले.

Tags:    

Similar News