'बॅनर फाटले तरी कामाला सुरुवात नाही' - आमदार राजू पाटील

Update: 2021-10-26 16:16 GMT

कल्याण डोंबिवली फेरीवाला मुक्त करा नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने करू असा इशारा मनसेने पालिका आयुक्तांना दिला आहे. खराब रस्त्यासाठी तत्कालीन सरकार जबाबदार असल्याचे विधान मंत्री जयंत पाटील यांनी कल्याणमध्ये केले होते. त्यांच्या या विधानावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पलटवार केला आहे. तत्कालीन सरकार युतीचे होते. त्यात शिवसेनाही होती. नक्की त्यांनी हा प्रश्न शिवसेना विचारला पाहिजे असा टोला लगावला आहे. इतकेच नाही रस्त्याच्या कामासाठी कोट्यावधी रुपये मंजूर झाल्याची बॅनरबाजी केली जाते. मात्र बॅनर फाटले तरी काम सुरु झालेले नाही अशी टीका आमदार राजू पाटील यांनी केली.

नागरी समस्यासंदर्भात भाजप आमदारांपाठोपाठ मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांची आज भेट घेतली. यावेळी खराब रस्ते, 27 गावातील पाणी प्रश्न, यासह इतर विकास कामांसदर्भात त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली. याबैठकी दरम्यान फेरीवाल्यांविषयी बोलताना कल्याण डोंबिवली या दोन्ही रेल्वे स्थानकातील परिसर फेरीवाला मुक्त झाला पाहिजे अन्यथा आम्ही आमच्या परीने मुक्त करुन घेऊ असा इशारा त्यांनी दिला.

निवडणूका आल्या की, यांचे बॅनरबाजी केली जाते. 111 कोटी आले, 137 कोटी आले. पैसे आले तर रस्ते कुठे दिसतात. जे बॅनर लावले ते फाटायला आले. अजून टेंडर नाही. म्हणजे अजून काम सुरुच नाही अशी घणाघाती टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे.

Tags:    

Similar News