पक्षातून हकालपट्टीनंतर भुयार यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

Update: 2022-03-25 07:45 GMT

राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यातील एकमेव आमदार देवेंद्र भुयारयांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. काही दिवसांपासून राजू शेट्टी आणि देवेंद्र भुयार यांच्यात मतभेद असल्याचे उघड झाले होते. . यावर आमदार देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सक्रिय नसल्याचा आरोप करत संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी देवेंद्र भुयार यांना घरचा रस्ता दाखवला. यानंतर देवेंद्र भुयार यांची फेसबुक पोस्ट (Facebook Post) चर्चेचा विषय राहली. "धन्यवाद' अशा शब्दात देवेंद्र भुयार यांनी फेसबुरकवर पोस्ट केली आहे. )

Full View

गुरूवारी देवेंद्र भुयार यांच्यावर राजू शेट्टी टीका करताना म्हणाले ज्या पोरावर विश्वास टाकला तो बिनकामाचा निघाला. देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सक्रिय नसल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केलाय.गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे शेतकऱ्यांची तसेच स्वाभिमानीची मानसिकता खचली आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत देवेंद्र भुयार शेतकरी संघटनेचा एकमेव आमदार म्हणून ते निवडून आले. त्यावेळी एका आमदाराला मंत्रीपद मिळावं यासाठी खासदार राजू शेट्टी यांची आग्रह भूमिका होती. मात्र देवेंद्र भुयार यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्यात आणि पक्षातील वरीष्ठ फळीत खटके उडत असल्याचे बोलले जात होते.

आमदार झाल्यानंतर देवेंद्र भुयार यांची इतर पक्षांशी जवळीक वाढत होती. यासोबतच अनेक अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने मध्यंतरी पत्रकार परीषदेत विदर्भ अध्यक्ष दामू अण्णा यांनी देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी केली होती. यावरुनच राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांना घरचा रस्ता दाखवल्याचे सांगितले जात आहे.

Tags:    

Similar News